Advertisement

एसटीच्या अॅपबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी दाखल

एसटी महामंडळाच्या मोबाईल अॅपबाबत सध्या मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत.

एसटीच्या अॅपबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी दाखल
SHARES

एसटी महामंडळाच्या मोबाईल अॅपबाबत सध्या मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. एसटीचं अॅप हे खासगी कंपनीच्या मदतीनं तयार करण्यात आलं आहे. खात्यातून पैसे जाऊनही तिकीट न येणं, मोबाइल अॅपवर एखाद्या मार्गावरील एसटीचा उल्लेखच नसणं, अनेक वेळा सर्व्हर बंद, या समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. त्यामुळं एसटी महामंडळानं लाखो रुपये खर्चून तयार केलेल्या या अॅपविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मोबाइल अॅप बंद

अनेकदा हे मोबाइल अॅप बंद असल्यानं प्रवाशांना गाडीच्या चौकशीसाठीही एसटी स्थानक अथवा आगारात जावं लागतं. देशातील सर्वात मोठं प्रवासी महामंडळ अशी ओळख एसटी महामंडळाची आहे. एसटीचे मोबाइल अॅप हाताळण्यासाठी सुलभ नाही. अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्याचं संदेश येत आहेत. तसंच, अनेकदा स्थानकातील उपलब्ध एसटी फेऱ्या अॅपवर दिसत नाहीत.

तांत्रिक अडचणी

एसटीच्या मोबाइल अॅपमध्ये तांत्रिक बाबीमुळं अडचणी येतात. अनेकदा सर्व्हर डाऊन असल्यामुळे अॅप सुरू होत नाही. त्यामुळे गाड्या न दिसणे, खात्यातून पैसे कमी होऊनही तिकीट न निघणे अशा अडचणी प्रवाशांना भेडसावू शकतात. प्रवाशांची तक्रार आल्यास त्या प्राधान्यानं सोडवण्याच्या सूचना ट्रायमॅक्स आणि महामंडळाच्या आयटी विभागाला देण्यात आल्या आहेत. याचबरोबर या तक्रारी कायमच्या सोडवण्यासाठी महामंडळाकडून उपाययोजना सुरू आहे.



हेही वाचा -

मुंबईतील दुकानं, हॉटेल्स रात्रभर सुरू ठेवण्याची काँग्रेसची मागणी

शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी २०० रुपये



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा