Advertisement

शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी २०० रुपये

शालेय विद्यार्थ्यांच्या सहली शैक्षणिक ठिकाणीच न्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी २०० रुपये
SHARES

मुंबईसह राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी सहलीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात येतं. यावेळी अनेकदा विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व शैक्षणिक ठिकाणी न नेता रेसॉर्ट व अन्य मजेच्या ठिकाणी नेलं जातं. मात्र, आता शालेय विद्यार्थ्यांच्या सहली शैक्षणिक ठिकाणीच न्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी आता समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत प्रति विद्यार्थी २०० रुपये दिले जाणार आहेत.

शैक्षणिक काम

या उपक्रमाखाली राज्यातील २२ हजार ७५० विद्यार्थ्यांसाठी ४५ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर करून शाळांनी विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील शैक्षणिक काम करणाऱ्या संस्था, ऐतिहासिक स्थळं, विज्ञान केंद्रे, वस्तुसंग्रहालयं, तारांगण आदी ठिकाणी सहलीसाठी न्यावे अशी अट घालण्यात आली आहे.

विचारांची देवाणघेवाण

त्याशिवाय, शक्य असेल तर विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यांत न्यावे जणेकरून तेथील विद्यार्थ्यांची त्यांचा संवाद होईल आणि विचारांची देवाणघेवाणही होण्यास मदत होईल. या नियोजित भेटीविषयीची कल्पना किमान ८ दिवस आधी जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहे.हेही वाचा -

महिला पोलिसावर रेल्वे प्रवाशांचा हल्ला

SBI च्या ग्राहकांचं 'हे' कार्ड होणार बंदसंबंधित विषय