Advertisement

SBI च्या ग्राहकांचं 'हे' कार्ड होणार बंद

एसबीआयच्या ग्राहकांच्या जुन्या कार्डची सेवा आता बंद होणार आहे.

SBI च्या ग्राहकांचं 'हे' कार्ड होणार बंद
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या ग्राहकांना आता जुन्या मॅग्नेटिक स्ट्राईपच्या कार्डऐवजी आता नवीन अधिक सुरक्षित असलेलं डेबिट कार्ड घ्यावं लागणार आहे. एसबीआयच्या ग्राहकांच्या जुन्या कार्डची सेवा बंद होणार आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत  ग्राहकांना अत्याधुनिक ईएमव्ही चिपचं कार्ड घ्यावं लागणार आहे. 

एसबीआयने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड अत्याधुनिक आणि सुरक्षित ईएमव्ही चिपमध्ये अपग्रेड केले आहेत. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ग्राहकांनी अत्याधुनिक ईएमव्ही चिपचं कार्ड घ्यावं, असं आवाहन बँकेने केलं आहे. हे कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या ग्राहकांना होम ब्रँचमध्ये जावं लागेल.  कार्ड बदलून घेणं मोफत असल्याचं एसबीआयने सांगितलं आहे. 

 ग्राहकांना इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही ईएमव्ही चिप कार्डमध्ये अपग्रेड होता येणार आहे.  ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कार्ड नोंदणीकृत पत्त्यावर येणार आहे. तसंच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मोबाईल नंबर अनिवार्य असणार आहे. खात्रीशीर, अधिकृत आणि ऑनलाईन पेमेंटसाठी पहिल्यापेक्षा अत्याधुनिक कार्ड घेऊन फसवणुकीपासून सुरक्षित राहा, असं आवाहन एसबीआयने केलं.



हेही वाचा -

या '७' टिप्सच्या मदतीनं नेटबँकिंगद्वारे भरा ऑनलाईन कर

२०२० मध्ये ७ मोठे विकेंड, 'ही' आहे सुट्ट्यांची लिस्ट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा