Advertisement

Coronavirus Updates: उबर 'या' तीन शहरात सेवा सुरू करणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

Coronavirus Updates: उबर 'या' तीन शहरात सेवा सुरू करणार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामधून केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना वगळण्यात आलं आहे. त्याचप्रमाणं आता उबेर ही अॅपवर आधारित टॅक्सी सेवाही सुरू होणार आहे. कॅब सर्विस प्रोव्हाईडर कंपनी उबरनं मुंबई, बेंगळुरू आणि दिल्लीतील लोकांना सेवा पुरवता यावी यासाठी फ्लिपकार्टसोबत कराराची घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र मिळून लॉकडाऊनच्या काळात लोकांना गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणार आहे.

सध्या लॉकडाऊन असल्यानं नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. लाखो लोकांना सध्या फळ, भाज्या, दूध, आवश्यक लागणारे सामान घरांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. देशात १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानं मुंबई, बेंगळुरू, दिल्लीसारख्या मोठ्या शहरात लोकांना आवश्यक सामान मिळणं कठीण झालं आहे. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आपली नवीन वितरण सेवा आणखी मजबूत करण्यासाठी फ्लिपकार्टसोबत करार करण्यात आला आहे. त्यामुळं या दोन कंपन्यामधील करार अर्थव्यवस्था चालवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. तसेच कोविड-१९ मुळे सध्या लोकांना होत असलेली अडचण सोडवण्यासाठी मदत मिळेल. सरकारनं सांगितल्यानुसार लोकांना सामान पोहोचवण्यासाठी मदत केली जाणार आहे.

उबर चालकांना पूर्णपणे शंभर टक्के पैसे या सेवेतून दिले जातील. बिग बास्केटसोबत आपल्या सेवेचा करार केल्याने उबरने बेंगळुरू, हैदराबाद, चंदीगड आणि नोएडा शहरातील लोकांना आपली सेवा दिली आहे. फ्लिपकार्टसोबत करार झाल्यामुळे मुंबईसह या तीन शहरातील लोकांना त्यांची सेवा पुरवण्यात येईल.



हेही वाचा -

Coronavirus : मुख्यमंत्र्यांचे संरक्षण करणारे १०० हून अधिक पोलिस क्वारंटाइन

Coronavirus Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०००च्या वर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा