Advertisement

उबर प्रवाशांचा विमा उतरवणार! दुर्घटनाग्रस्तांना 'इतकी' रक्कम मिळणार

आॅनलाइन कॅब सेवा देणारी कंपनी उबरने आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्रवाशांसाठी आकर्षक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार उबर आपल्या प्रवाशांसाठी दुर्घटना विमा सुरू करणार आहे.

उबर प्रवाशांचा विमा उतरवणार! दुर्घटनाग्रस्तांना 'इतकी' रक्कम मिळणार
SHARES

आॅनलाइन कॅब सेवा देणारी कंपनी उबरने आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्रवाशांसाठी आकर्षक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार उबर आपल्या प्रवाशांसाठी दुर्घटना विमा सुरू करणार आहे. यामुळे प्रवासादरम्यान दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाशांना आर्थिक मदत मिळू शकेल. 

कुणासाठी किती विमा?

उबर कंपनीच्या कार, थ्री व्हिलर आणि मोटरसायकल सेवे अंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही विमा योजना असेल. या योजनेनुसार एखाद्या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास संबंधित प्रवाशाला ५ लाख रुपये मिळतील. तर प्रवासी जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला उपचारांसाठी ५० हजार रुपये आणि ओपीडीतील खर्चासाठी ५ हजार रुपये मिळतील.

‘या’ विमा कंपन्या

उबर कंपनी भारतातील ४० शहरांमध्ये आपली सेवा देते. या विमा सेवेसाठी उबरने कारमधील प्रवाशांसाठी भारती एक्सा विमा कंपनीसोबत करार केला आहे. तर थ्री व्हिलर आणि मोटरसायकल सेवेसाठी टाटा एआयजी विमा कंपनीसाठी करार केला आहे.

विश्वास वाढेल

उबरचे भारतातील आॅपरेशनल प्रमुख (राइड्स) पवन वैश्य म्हणाले की, आमच्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या ड्रायव्हर्सकरीता आम्ही याआधीच विमा सुरक्षेचं कवच देऊ केलं आहे. त्यानंतर आता आम्ही प्रवाशांना विमा सेवा देत आहोत. यामुळे त्यांचा आमच्यावरील विश्वास वाढीस लागेल. 



हेही वाचा-

PMC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आरबीआयने वाढवली पैसे काढण्याची मर्यादा

कुठल्याही बँका बंद होणार नाहीत, RBI कडून अफवांवर खुलासा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा