Advertisement

बेस्टच्या चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरुवात

चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

बेस्टच्या चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरुवात
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची (mumbai) दुसरी लाइफलाइन असलेल्या 'बेस्ट'नं (best) वाहतूक सेवा पुरवली. आपला जीव धोक्यात घालून कर्मचारी त्यावेळी सेवा देत होते. मात्र, सध्यस्थितीत कोरोनावर विरोधात लसीकरण केलं जातं असून, मागील १० महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्ट उपक्रमातील ३४ हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे.

चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. कोरोनाकाळात सुरुवातीपासूनच बेस्ट उपक्रमानं परिवहन सेवा दिली. या काळात आगारातील चालक, वाहक, वाहतूक निरीक्षकांसह यांत्रिकी कर्मचारी मोठ्या संख्येनं कार्यरत होते. तर विद्युत विभाग, अभियंता विभागातील कर्मचाऱ्यांनीही सेवा दिली.

लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर बेस्टनं पूर्ण प्रवासी क्षमतेनं बसगाड्या चालवण्यास सुरुवात केली. मागील १० महिन्यांच्या काळात विविध विभागांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत २ हजार ८०५ अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, यामध्ये बहुतांश कर्मचारी परिवहन व विद्युत विभागातील आहेत.

सुमारे १५ कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बेस्टमध्ये करोनामुक्तीचे प्रमाण ९६ टक्के पेक्षा अधिक आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई पालिका (bmc) व बेस्ट उपक्रमानंही नियोजन केलं व गेल्या बुधवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली. बेस्ट उपक्रमात विविध विभागांत मिळून सुमारे ३४ हजार अधिकारी, कर्मचारी असून सर्वाचे टप्प्याटप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमात जवळपास १८ हजार चालक, वाहक आहेत. कर्मचारी २२ लसीकरण केंद्रांवर सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत लस घेऊ शकतात. बेस्ट प्रशासनाने यापूर्वीच कोविन अ‍ॅपवर कर्मचाऱ्यांची नोंदणी केली आहे. असं असलं तरीही केंद्रावर जाताना कर्मचाऱ्यांनी बेस्टचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



हेही वाचा -

कोरोना रुग्णांमध्ये वाढ, राज्य सरकार मोठा निर्णय घेणार?

तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा