कॉटनग्रीन, डॉकयार्ड रेल्वे स्टेशनवर तपासणी

 Mumbai
कॉटनग्रीन, डॉकयार्ड रेल्वे स्टेशनवर तपासणी
कॉटनग्रीन, डॉकयार्ड रेल्वे स्टेशनवर तपासणी
कॉटनग्रीन, डॉकयार्ड रेल्वे स्टेशनवर तपासणी
कॉटनग्रीन, डॉकयार्ड रेल्वे स्टेशनवर तपासणी
See all

वडाळा - वडाळा रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील कॉटनग्रीन रेल्वे स्टेशन आणि डॉकयार्ड स्टेशन येथे बुधवारी रेल्वे पोलिसांतर्फे तपासणी करण्यात आली.

अतिरेकी संघटनाकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांच्या अनुषंगाने आणि रेल्वे प्रवाश्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून पोलीस उप-निरीक्षक अनिल बर्वे,

दोन पोलीस हवालदार, दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी ही तपासणी केली.

या वेळी कॉटनग्रीन रेल्वे स्थानकावर 13 संशयित व्यक्ती आणि 15 बॅग तपासण्यात आल्या. तसंच डॉकयार्ड रेल्वे स्थानक येथे 17 संशयित व्यक्ती आणि 12 बॅग तपासल्या. तसंच, प्लॅटफॉर्मवरील आणि स्टेशन परिसरातील अडगळीच्या जागाही तपासण्यात आल्या.

Loading Comments