Advertisement

मुंबई ते अलिबाग प्रवास ४० मिनिटांत, वॉटर टॅक्सी सेवा सुरू

आजपासून सुरू झालेल्या मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवेचे टाईमटेबल ते तिकिटांपासून सर्व माहिती जाणून घ्या.

मुंबई ते अलिबाग प्रवास ४० मिनिटांत, वॉटर टॅक्सी सेवा सुरू
SHARES

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या अलिबागला मुंबईहुन केवळ ४० मिनिटांत पोहचणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 

मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी क्षमता

मुंबई-मांडवादरम्यान २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी धावणार आहे. खालच्या डेकवर 140 आणि वरच्या डेकवर 60.

मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सीच्या वेळा

हे जहाज मांडवा आणि परतीच्या सहा फेऱ्या करेल. येथे पूर्ण वेळापत्रक आहे:

मुंबई ते मांडवा

10.30am
12.50pm
3:10pm

मांडवा ते मुंबई

11.40am
2.00pm
4:20pm

मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सीचा खर्च आणि प्रवासाचा वेळ

खालच्या डेकसाठी 400 रुपये आणि वरच्या डेकसाठी 450 रुपये तिकीट लागेल. डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते मांडवा प्रवासाची वेळ सुमारे 40 मिनिटे आहे.

इतर सुविधा

हे जहाज पूर्णपणे वातानुकूलित आहे आणि वरच्या डेकवर दोन आणि खालच्या डेकवर चार वॉशरूम आहेत. जरी त्याचा वेग 22 नॉट्सपर्यंत जाऊ शकतो, परंतु तो 15 नॉट्सपर्यंत जाईल. वेग त्याच्या 2-750 HP व्हॉल्वो पेंटा हाय-स्पीड इंजिनमुळे आहे.

नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कॅप्टन रोहित सिन्हा सांगतात की, कॅटमरानमध्ये सुरक्षिततेसाठी फायर सेन्सर्सपासून स्प्रिंकलर सिस्टीमपर्यंत नेव्हिगेशन तंत्रज्ञानातील अत्याधुनिक गोष्टी यात आहेत. 

मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सध्या भाऊचा धक्का येथून रो रो सेवा सुरू आहे. रो रोने अलिबागला पोहचण्यासाठी ६० ते ७० मिनिटे लागतात. मात्र हा प्रवास आणखी जलद गतीने पार करण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा