Advertisement

'द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद' ही अफवाच !


'द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद' ही अफवाच !
SHARES

मेट्रो-7 प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू असताना या कामात अडथळा येऊ नये म्हणून पश्चिम द्रुतगती मार्ग पुढील काही दिवसांसाठी मध्यरात्री ते पहाटे पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना देणार एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हॉटस्अपवर व्हायरल झाला आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये गोंधळ उडाला आहे. मात्र ही अफवा असल्याची माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

व्हॉटस्अपवर दिशाभूल करणारे अथवा संभ्रम निर्माण करणारे अनेक मेसेज व्हायरल झाले आहेत. अशा मेसेजमुळे निर्माण होणाऱ्या संभ्रमामुळे अनेक मुंबईकरांना मनस्ताप सोसावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर मेट्रो-7 प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच या कामासाठी पुढील काही दिवस मध्यरात्री ते पहाटे 5 पर्यंत हा द्रुतगती महामार्गवाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचा मेसेज व्हॉटस्अपवर व्हायरल झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता.

या मेसेजची सत्यसत्यता पडताळण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'ने एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी मेट्रोचे काम सुरू असले तरी द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी बंद करणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले.


रविवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत मेट्रो-7 च्या कामासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असून, गोरेगावच्या 200 मीटर परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. 

दिलीप कवठकर, सहप्रकल्प संचालक,एमएमआरडीए

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा