Advertisement

अंधेरी ते विरारपर्यंत १५ डब्यांची स्लो लोकल

मुंबई उपनगरात सुरुवातीपासून पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर १२ डबा लोकल गाड्या धावत आहेत. पण, प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि लोकल गाडयांवर पडणारा ताण पाहता १२ डबा लोकल गाड्यांना तीन डबे जोडून १५ डबा लोकलही चालविल्या जात आहेत.

अंधेरी ते विरारपर्यंत १५ डब्यांची स्लो लोकल
SHARES

पश्चिम रेल्वेवर सध्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अंधेरी ते विरार हा प्रवास करणं अनेकदा जिकरीचं होऊन बसतं. यावर तोडगा म्हणून रेल्वे प्रशासनाने अंधेरी ते विरार १५ डब्यांची धिमी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राट दिल्यानंतर २ वर्षांत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य असल्याचं पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी सांगितलं.

यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याबाबत निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

प्रवाशांना फायदा

मुंबई उपनगरात सुरुवातीपासून पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर १२ डबा लोकल गाड्या धावत आहेत. पण, प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि लोकल गाडयांवर पडणारा ताण पाहता १२ डबा लोकल गाड्यांना तीन डबे जोडून १५ डबा लोकलही चालविल्या जात आहेत.

करावी लागते कसरत

गेल्या काही वर्षांत अंधेरी ते बोरिवली या पट्ट्यात प्रवाशांची संख्या बरीच वाढली आहे. दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड आणि नालासोपारा स्थानकातून लोकलमध्ये प्रवेश करताना प्रवाशांना बरीच कसरत करावी लागते.

फेऱ्या वाढवणार

एकंदरीतच हा प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने १५ डबा लोकलचं एक वेगळंच नियोजन केलं आहे. जास्तीत जास्त प्रवासी यामधून प्रवास करू शकतील यादृष्टीने या दोन स्थानकादरम्यान १५ डबा लोकलच्या फेऱ्याही अधिक चालवल्या जाणार आहेत.

हेही वाचा-

उन्हाळ्यात प्रवास होणार 'कूल', बम्बार्डिअर लोकलला लवकरच ३ एसी डबे

हार्बर लाईन होणार सुसाट; १०५ किमी/तास वेगाने धावणार!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा