Advertisement

हार्बर लाईन होणार सुसाट; १०५ किमी/तास वेगाने धावणार!

हार्बर लोकल सीएसएमटी ते पनवेल मार्गावर ८൦ किमी प्रति तास वेगाने धावते. या मार्गावरील मानखुर्द ते पनवेल दरम्यान गाडीचा वेग १൦५ किमी प्रति तासापर्यंत वाढवण्याचं प्रस्तावित आहे. असं झाल्यास सीएसएमटी ते पनवेल दरम्यान प्रवासात १൦ ते १५ मिनिटांची बचत होणार आहे.

हार्बर लाईन होणार सुसाट; १०५ किमी/तास वेगाने धावणार!
SHARES

हार्बर प्रवाशांसाठी खूषखबर आहे. हार्बर मार्गावरील प्रवास आता आणखी वेगाने होणार आहे. सध्या हार्बर लोकल सीएसएमटी ते पनवेल मार्गावर ८൦ किमी प्रति तास वेगाने धावते. या मार्गावरील मानखुर्द ते पनवेल दरम्यान गाडीचा वेग १൦५ किमी प्रति तासापर्यंत वाढवण्याचं प्रस्तावित आहे. असं झाल्यास सीएसएमटी ते पनवेल दरम्यान प्रवासात १൦ ते १५ मिनिटांची बचत होणार आहे.


या वर्षीच होणार हार्बर सुसाट!

या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. यातल्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत. शिवाय, सर्व बाबी पूर्ण झाल्या, तर या वर्षीच हार्बर लोकलचा स्पीड वाढलेला मुंबईकरांना अनुभवायला मिळेल, असं मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के.जैन यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.


पावसाळ्यात त्रास होणार नाही

तसंच, येत्या पावसाळ्यासाठीही मध्य रेल्वेने तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत ७५ हजार क्यूबिक मीटर (cubic meter) कचरा, डेबरीज गेल्या काही महिन्यांत विविध रुळांच्या आसपासच्या परिसरातून काढला आहे. मान्सूनमध्ये मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही, या दृष्टीने तयारीला सुरुवात केली असल्याचं तसंच, महानगर पालिका प्रशासन आणि रेल्वेमध्ये समन्वय साधून हे काम पूर्ण केलं जाणार असल्याचंही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

आता पावसाळ्यात हार्बर मार्ग तुंबणार नाही! कल्व्हर्टचं होणार रूंदीकरण!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा