Advertisement

सीएसएमटी-गोरेगाव हार्बरच्या ४२ फेऱ्या


सीएसएमटी-गोरेगाव हार्बरच्या ४२ फेऱ्या
SHARES

येत्या १ एप्रिलपासून सीएसएमटी ते गोरेगाव अशी हार्बर सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या मार्गाचं उद्घाटन गुरूवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. या मार्गावरुन पहिल्या टप्प्यात एकूण ४२ सेवा चालवण्यात येणार आहेत.


अशा होतील सेवा

सीएसएमटी ते गोरेगाव २१ आणि गोरेगाव ते सीएसएमटी २१ अशा एकूण ४२ फेऱ्या या मार्गावर धावणार आहेत. सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी या मार्गावर सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ६.३७ पर्यंत तसंच अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर सकाळी ९.५३ ते संध्याकाळी संध्याकाळी ७.२९ पर्यंत धावणाऱ्या सर्व सेवा पुढे गोरेगापर्यंत चालवण्यात येणार आहे. यातील कुठल्याही लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही.


गोरेगावपर्यंत विस्तार

शिवाय पश्चिम रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या ५ अतिरिक्त सेवा (३ अंधेरी ते सीएसएमटी आणि २ सीएसएमटी ते अंधेरी) या देखील गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

शिवाय, हार्बर मार्गावर अंधेरी ते गोरेगावपर्यंत विस्तारित सेवेचा तपशीलवार वेळ या वेबसाइट http://www.cr.ca उपलब्ध आहे.



हेही वाचा-

गोरेगावपर्यंत हार्बरला मुहूर्त, गुरूवारी होणार उद्घाटन

हायब्रीड बस कुणाच्या फायद्याची? थेट मार्ग, क्षमताही कमी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा