Advertisement

हार्बर १ एप्रिलपासून गोरेगावपर्यंत धावणार


हार्बर १ एप्रिलपासून गोरेगावपर्यंत धावणार
SHARES
Advertisement

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते गोरेगाव हार्बर विस्तारीकरण प्रकल्पाचा अखेर गुरुवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या मार्गावरून १ एप्रिलपासून सेवा चालवण्यात येत आहे. शिवाय, कार्यक्रमावेळी शिवसेना विरुद्ध भाजपा श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली.

यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईकरांसाठी आणखी काही घोषणा केल्या. ७० लोकलमध्ये ३ टप्प्यात ३ एसी डब्बे लावण्यात येईल. याचे २५० ते ३०० फेऱ्या चालवण्यात येतील. परिणामी फस्ट आणि सेकण्ड क्लासच्या प्रवाशांना एसीचा प्रवास घडणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुष असे वेगवेगळे कोच असतील. तसेच ही हार्बर बोरीवलीपर्यंत धावणार असल्याचं देखील रेल्वमंत्री गोयल यांनी सांगितले.


रंगला श्रेयवाद

स्थानिक आमदार सुनील प्रभू यांचं नाव नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत स्थानिक आमदार सुनील प्रभू यांचं नाव नसल्याने कार्यकर्त्यांनी गोरेगाव स्थानकावर जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसंच याचे काही जण श्रेय जरी लाटत असले तरी ही सेवा फक्त शिवसेनेमुळे सुरू झाल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली.

राममंदिर स्थानकावरूनही श्रेयवाद 

जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकाच्यामध्ये उभारलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी तात्कातीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सेना आणि भाजपाने जोरदार घोषणाबाजी करून शक्ति प्रदर्शन केले होतं, त्यामुळ घोषणाबाजीत हा उद्घाटन सोहळा आटोपता घ्यावा लागला होता.


यावेळी इतर स्थानकांवर पुरवण्यात आलेल्या वेगवेगळ्या सेवासुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. मात्र, हार्बर गोरेगाव हा मार्ग प्रत्यक्षात १ एप्रिलपासून सूरू होणार आहे. सुमारे चार वर्षांच्या विलंबानंतर गेल्या डिसेंबरमध्ये पूर्णत्वास आल्यानंतर अखेर हार्बर गोरेगाव मार्गाला १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. गुरुवारी  संध्याकाळी गोरेगाव स्थानकात या नवीन सेवेचं उद्घाटन करण्यात आलं.‌

प्रवाशांचा फायदा

मुंबई रेल्वे विकास महांमडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी-२) अंतर्गत हा प्रकल्प आखला होता. सध्या पश्चिम रेल्वेच्या अखत्यारितून जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल अंधेरीपर्यंत जातात. या लोकलचा विस्तार गोरेगावपर्यंत केल्याने उपनगरातील हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

मात्र, हा प्रकल्प चार वर्षांपूर्वी पूर्ण अपेक्षित असताना त्यास डिसेंबर २०१७ उजाडले. मात्र, त्यानंतरही या सेवांचे उद्घाटन न केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. सर्व तांत्रिक कामे पूर्ण होउनही ही सेवा प्रत्यक्षात येत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना त्याचे आश्चर्य वाटत होते.

४९ फेऱ्या धावणार

१ एप्रिलपासून एकूण ४९ फेऱ्या होणार असून एप्रिल ते मेपर्यंत त्यात आणखी वाढ होणार आहे. या नवीन सेवेमुळे हार्बर मार्गावरून सीएसएमटी, पनवेल, वडाळा, वांद्रे गाठण्यासाठी अंधेरी स्थानकात जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळेच हजारो प्रवाशांकडून ही सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात होती. या सेवेमुळे अंधेरी स्थानकावर पडणारा ताणही कमी होण्याची शक्यता आहे.
 

अन्य सुविधांचं उद्घाटन

सीएसएमटी, डॉकयार्ड रोड, ठाणे, लोणावळा स्थानकातील नवीन सरकते जिने. बोरिवली, दादर (पश्चिम), डॉकयार्ड रोड, वडाळा, चेंबूर, लोणावळा स्थानकात लिफ्ट, चुनाभट्टी-विरार येथे पादचारी पूल, पश्चिम-मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकांवरील एलइडी दिवे आणि पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर आणि सांताक्रूझ स्थानकातील सौर उर्जा पॅनेलचं उद्घाटन करण्यात आलं.


हेही वाचा - 

गोरेगावपर्यंत हार्बरला मुहूर्त, गुरूवारी होणार उद्घाटन

संबंधित विषय
Advertisement