Advertisement

गोरेगावपर्यंत हार्बरला मुहूर्त, गुरूवारी होणार उद्घाटन

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हार्बर गोरेगाव विस्तार मार्ग सुरू करण्याचा प्रस्ताव होता. पण, काही तांत्रिक कारणांमुळे हा मार्ग रखडला. पण, २९ मार्चपासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येत आहे.

गोरेगावपर्यंत हार्बरला मुहूर्त, गुरूवारी होणार उद्घाटन
SHARES

गोरेगावपर्यंत हार्बर मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला असून हा मार्ग गुरूवारपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होणार आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हार्बर गोरेगाव विस्तार मार्ग सुरू करण्याचा प्रस्ताव होता. पण, काही तांत्रिक कारणांमुळे हा मार्ग रखडला. पण, २९ मार्चपासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येत आहे.


रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

२९ मार्चला या विस्ताराचं उद्घाटन होणार आहे. तब्बल ३१६ कोटी खर्च करून अंधेरी ते गोरेगाव हार्बरचा विस्तार पूर्ण करण्यात आला आहे. हजारो प्रवाशांना या विस्तारीकरणाचा फायदा होणार आहे.


'या' सेवाही सुरू

त्याचसोबत सीएसएमटी, डॉकयार्ड रोड, ठाणे, लोणावळा स्थानकातील नवीन सरकते जीने, बोरिवली, दादर(पश्चिम), डॉकयार्ड रोड, वडाळा रोड, चेंबूर, लोणावळा स्थानकातल्या लिफ्टचं उद्घाटन होणार आहे. चुना भट्टी स्थानक पादचारी पूल आणि विरार इथल्या विस्तारित पादचारी पुलाचे ही उद्घाटन करण्यात येणार आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वे वरील सर्व स्थानकावर लावण्यात आलेल्या एलईडी लाइट्स, पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर आणि सांताक्रूझ स्थानकात लावण्यात आलेल्या सोलार पॅनलच लोकार्पण होणार आहे.

सुरुवातीला या मार्गावरुन ४९ फेऱ्या चालवण्यात येणार असून, एप्रिल-मेपर्यत आणखी फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.



हेही वाचा-

चाचणी यशस्वी, पण गोरेगावपर्यंत हार्बरला मुहूर्त कधी?

फुकट्या प्रवाशांकडून १० कोटींचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेची कारवाई



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा