Advertisement

'परे' ची वाहतूक कोलमडली


'परे' ची वाहतूक कोलमडली
SHARES

मुंबई -  शुक्रवारी सकाळी 'परे'ने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना त्रासाचा सामना करावा लागला. रुळाला तडे गेल्यामुळे 'परे' काही तासांसाठी कोलमडली. मात्र विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू ट्रॅकवर येत आहे. रुळ दुरुस्त करुन वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे. गोरेगाव- मालाड दरम्यान रेल्वेरुळाला तडे गेल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.

त्यामुळे चर्चगेटवरून बोरीवलीकडे जाणारी वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहे. त्याशिवाय बोरीवली स्टेशनवरून लोकल सुटत नसल्यानं स्टेशनवर मोठी गर्दी झाली.

बोरीवली स्टेशनवरच लोकल रखडल्याने त्यापुढील प्रत्येक स्टेशनवर त्याचा ताण पडत आहे. परिणामी चर्चगेटच्या दिशेने सर्व स्टेशनवर गर्दी वाढत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा