Advertisement

लोअर परळ उड्डाणपुलासाठी मार्च २०२२चा मुहूर्त

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकाजवळ असलेल्या उड्डाणपुलाचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.

लोअर परळ उड्डाणपुलासाठी मार्च २०२२चा मुहूर्त
SHARES

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकाजवळ असलेल्या उड्डाणपुलाचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. लोअर परळचा हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद असल्यानं या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दरम्यान, २०२२ उड्डाणपुलाचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्यानं या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी किमान सव्वा वर्ष लागणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) आणि अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे, महापालिका व आयआयटीनं रेल्वे हद्दीतील पादचारी पूल व उड्डाणपुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. यात लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाचं रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे आणि पालिका हद्दीतील काम मुंबई पालिकेने करण्याचा निर्णय घेतला.

पूल निर्मितीसाठी पायलिंगचं आणि अन्य काम १४ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू आहे. रेल्वे हद्दीतील पुलाचं काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती मिळते. गर्डर बसवण्याचं काम अद्याप झालेले नाही. ते पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. रेल्वे हद्दीतील भाग पूर्ण होताच पालिका हद्दीत असलेल्या पुलाचे दोन्ही भाग मुंबई पालिकेकडून केलं जाणार असल्याची माहिती मिळते. ते काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती मिळते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा