Advertisement

वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीमुळं अंधेरी स्थानकात वावरणं कठीण


वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीमुळं अंधेरी स्थानकात वावरणं कठीण
SHARES

वाढलेली प्रवाशांची गर्दी आणि स्टॉलची संख्या यांमुळे अंधेरी स्थानकात प्रवाशांना वावरणेही कठीण झाले आहे. प्रवाशांची सुरक्षितता व त्यांना मोकळी जागा मिळावी या उद्देशाने खाद्यपदार्थासह अन्य वस्तूंचे स्टॉल स्थानका लागतच्या डेकवर स्थलांतरित करण्याचा विचार पश्चिम रेल्वे करीत आहे.

अंधेरी रेल्वे स्थानकात प्रवाशांना वावरण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकात (तेव्हाचे एल्फिन्स्टन) चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत काही व्यक्तींना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वेने सर्वच स्थानकांतील गर्दीवरील नियंत्रण व नियोजनाचे काम हाती घेतले. स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना वावरण्यासाठी मोकळी व सुटसुटीत जागा उपलब्ध व्हावी यानुसार नियोजन करण्यात आले.

विरार व चर्चगेट येथून अंधेरीमार्गे अनेक लोकल गाडय़ा जातात. तर अंधेरी स्थानकातूनही सुटणाऱ्या गाडय़ांची संख्या अधिक आहे. शिवाय हार्बर मार्गावरील लोकलही तेथे थांबतात. परिणामी, स्थानकात दिवसभरात लाखोच्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असते. अंधेरी स्थानकात खाद्यपदार्थ स्टॉलसह अन्य स्टॉलही आहेत. त्यामुळे स्थानकात वावरताना किंवा प्रवेश तसेच बाहेर पडताना गर्दीला सामोरे जावे लागते. यामुळे चेंगराचेंगरीचा धोकाही संभवतो.

अंधेरी स्थानकाला लागूनच रिक्षांसाठी २०१३ साली डेक उभारण्यात आला होता. ६० मीटर लांब आणि ३४ मीटर रुंद अशा दोन मार्गिका या डेकवर आहेत. ही जागा त्यांना दिली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. अंधेरी स्थानकात उतरून अनेक जण मेट्रो पकडण्यासाठी जातात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत या स्थानकातील प्रवाशांची संख्या वाढली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा