Advertisement

चर्चगेटच्या ‘सब वे’त लागणार सरकते जिने

चर्चगेट स्थानकातील सब वे त पश्चिम रेल्वे प्रशासन लवकरच सरकते जिने लावण्याची तयारी करत आहे. हे सरकते जिने लागल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

चर्चगेटच्या ‘सब वे’त लागणार सरकते जिने
SHARES

मुंबईतील सर्वाधिक गजबजलेल्या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाठोपाठ चर्चगेट रेल्वे स्थानकाचा समावेश होतो. या स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या स्थानकातील सब वे त पश्चिम रेल्वे प्रशासन लवकरच सरकते जिने लावण्याची तयारी करत आहे. हे सरकते जिने लागल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.  

प्रवाशांची गैरसोय

चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेचं मुख्यालय तसंच इराॅस सिनेमागृहाच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या सब वे च्या पायऱ्या अरुंद आहेत. तिथं सरकते जिने वा लिफ्टची सोय नसल्याने दिव्यांगांना तसंच ज्येष्ठ नागरिकांना गर्दीच्या वेळेस चर्चगेट स्थानकातून बाहेर पडणं किंवा आत शिरणं कठीण होतं. त्यामुळे तिथं सरकते जिने बसवण्याची प्रवाशांकडून सातत्याने मागणी होत आहे. 

सकारात्मक प्रतिसाद

परंतु जिन्याचा भाग मुंबई महापालिकेच्या हद्दीत मोडत असल्याने पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसला सरकते जिने उभारण्याचा एक प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या सब वेत एकूण ४ सरकते जिने बसविण्याची परवानगी मागितली आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सब वेत सरकते जिने लागल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.



हेही वाचा-

एसी लोकलची एप्रिलमध्ये १ कोटी ८३ लाख कोटींची कमाई

मुंबईत महिलांसाठी केवळ ३ हजार सार्वजनिक शौचालयं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा