Advertisement

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १ कोटीचा दंड वसूल

फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असून, या कारवाईच्या माध्यमातून १ कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १ कोटीचा दंड वसूल
SHARES

'लोकलनं प्रवास करताना विनातिकीट प्रवास करू नका', असं वारंवार प्रवाशांना सांगितलं जात. मात्र, तरिही अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत आहेत. त्यामुळं अशा फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असून, या कारवाईच्या माध्यमातून १ कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं तब्बल २६ हजार प्रवाशांकडून सात महिन्यांच्या काळात एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. लोकल प्रवासांवर मर्यादा असतानाही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे.

तिकीट तपासणी, रेल्वे सुरक्षा दलाला घेऊन नियमित तपासणीबरोबरच विशेष तपासणी मोहीमही हाती घेण्यात आल्या. या वेळी एकूण २५ हजार ९८२ प्रवासी विनातिकीट आढळले. यात १९ हजार १७२ प्रवासी उपनगरीय मार्गावर आढळले असून, त्यांच्याकडून ५५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर ६ हजार ८१० प्रवासी मेल-एक्स्प्रेस मार्गावर सापडले आहेत.

यामध्येही ऊर्वरित दंड वसूल केला आहे. याशिवाय बनावट ओळखपत्र बाळगून लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, मे ते नोव्हेंबर या काळात हा दंड वसूल करण्यात आला.

Read this story in English
संबंधित विषय