Advertisement

पश्चिम रेल्वेवर सोमवारी गोरेगाव ते मालाड दरम्यान ब्लॉक

ब्लॉक रात्रीच्या वेळेत असला तरी 150 ते 175 लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तसंच, लोकलचा वेगदेखील मंदावणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक

पश्चिम रेल्वेवर सोमवारी गोरेगाव ते मालाड दरम्यान ब्लॉक
SHARES

पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून या कामासाठी सोमवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सोमवारी रात्री 12.30 ते मंगळवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत गोरेगाव ते मलाड स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलम मार्गावर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक काळात 150 ते 175 लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तसंच, लोकलचा वेगदेखील मंदावणार आहे. 

पश्चिम रेल्वेवर सध्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात येत आहे. राम मंदिर, गोरेगाव आणि मालाड या स्थानकांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

सोमवारी अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत 150 ते 175 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. तसंच, 4 ऑक्टोबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना अनियमित वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे. 

प्रवाशांना असेही सूचित करण्यात आले आहे की ब्लॉक कालावधी दरम्यान UP आणि DOWN मेल/एक्स्प्रेस गाड्यांना अंदाजे 10 ते 20 मिनिटे उशीर होईल.

सोमवार, 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या शेवटच्या उपनगरीय गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

1. चर्चगेट - विरार लोकल चर्चगेटहून 23:27 वाजता सुटेल, विरारला 01:15 वाजता पोहोचेल.

२. चर्चगेट – अंधेरी लोकल चर्चगेटहून 01:00 वाजता सुटेल, अंधेरी येथे 1:35 वाजता पोहोचेल.

3. विरार - चर्चगेट लोकल विरारहून 23:30 वाजता सुटेल, चर्चगेटला 01:10 वाजता पोहोचेल.

4. बोरिवली – चर्चगेट लोकल बोरिवलीहून 00:10 वाजता सुटेल, चर्चगेटला 01:15 वाजता पोहोचेल.

5. गोरेगाव - सीएसएमटी लोकल गोरेगावहून 00:07 वाजता सुटेल, सीएसएमटीला 01:02 वाजता पोहोचेल.

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पहिल्या उपनगरीय गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

1. विरार – बोरिवली लोकल (स्लो मोड) विरारहून 03:25 वाजता सुटणारी अतिरिक्त लोकल म्हणून चालवली जाईल आणि बोरिवलीला 04:00 वाजता पोहोचेल.

2. बोरीवली – चर्चगेट लोकल (स्लो मोड) बोरिवलीहून 04:25 वाजता सुटणारी अतिरिक्त लोकल म्हणून चालवली जाईल, चर्चगेटला 05.30 वाजता पोहोचेल.

"या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय गाड्या प्रभावित होतील आणि ब्लॉक कालावधीत त्या रद्द / अल्प कालावधीत रद्द केल्या जातील. रद्द / अंशतः रद्द केलेल्या गाड्यांची यादी. या संदर्भात सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे," असे पश्चिम रेल्वेने रविवारी सांगितले.

तसंच, या प्रकल्पासाठी एकूण 128.37 तास कार्यरत ब्लॉक्सची आवश्यकता आहे. त्यापैकी 43.30 तास शिल्लक आहेत. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून, या कामानिमित्त हे ब्लॉक घेतले जात आहेत. 



हेही वाचा

मेट्रो 2B, 4 आणि 9 चा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार

Metro 3चे तिकीट आणि वेळापत्रक जाणून घ्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा