Advertisement

पश्चिम रेल्वेची अहमदाबाद ते चेन्नई दरम्यान विशेष ट्रेन


पश्चिम रेल्वेची अहमदाबाद ते चेन्नई दरम्यान विशेष ट्रेन
SHARES

प्रवाशांच्या सोईसाठी आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांतील गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अहमदाबाद ते चेन्नई दरम्यान विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला वसई रोड आणि कल्याण इथं थांबा देण्यात आला आहे.


अहमदाबाद- चेन्नई स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक- ०६०५२
  • कधी धावणार- ९ जुलै २०१८ पासून ३० जुलै २०१८ पर्यंत (दर सोमवारी)
  • किती वाजता- सकाळी ९.४० वाजता
  • कधी पोहचणार- दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.१० वाजता


चेन्नई- अहमदाबाद स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक- ०६०५१
  • कधी धावणार- ७ जुलै २०१८ पासून २८ जुलै २०१८ पर्यंत (दर शनिवारी)
  • किती वाजता- रात्री ८.१० वाजता
  • कधी पोहचणार- सोमवारी सकाळी ५.४५ वाजता

थांबे नडियाद, आणंद, वडोदरा, सूरत, वापी, बोईसर, वसई रोड, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, रायचूर, मंत्रालयम रोड, अडोनी, गुंतकल, गूटी, तडीपात्री, येरागुंटला, कडप्पा, राजमपेटा, कोडुरू, रेनिगुंटा, अराकोणम

या गाडीला तृतीय श्रेणी वातानुकूलित, शयनायन, आणि द्वितीय श्रेणी सामान्य डबे असतील. ०६०५२ या गाडीचं बुकिंग ४ जुलै पासून 'आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावरून सुरु होईल.हेही वाचा-

बुलेट ट्रेनची नाही तर सुरक्षित रेल्वेची खरी गरज - मेट्रोमॅन ई श्रीधरन

मुंबई-नागपूर मार्गावर 50 ई-चार्जिंग स्‍टेशनसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा