Advertisement

प. रेल्वेच्या १२ पैकी ३ डब्यांमध्ये लागणार एसी

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या १२ डब्यांच्या सामान्य लोकलचे ३ डबे वातानुकूलित करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.

प. रेल्वेच्या १२ पैकी ३ डब्यांमध्ये लागणार एसी
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या १२ डब्यांच्या सामान्य लोकलचे ३ डबे वातानुकूलित करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वे बोर्ड व पश्चिम रेल्वे प्रशासनातील वाद जवळपास मिटल्याचं म्हटलं जात आहे. 

पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या वातानुकूलित लोकलला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून ही लोकल ट्रेन चालवण्यात येत असल्याने प्रवाशांमध्येही नाराजी आहे. त्यातच पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व लोकल ट्रेन अर्धवातानुकूलित स्वरूपात चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी १२ डब्यांच्या सामान्य लोकलचे ६ डबे वातानुकूलित करण्यात येणार होते. 

हेही वाचा- अवजड वाहनांविरोधात १० महिन्यांत 'इतक्या' तक्रारी

परंतु रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाला प्रवाशांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने लोकलचे तीनच डबे वातानुकूलित करावेत, असं पश्चिम रेल्वेचं म्हणणं होतं. त्यावरून रेल्वे बोर्ड आणि पश्चिम रेल्वेत वाद सुरू होता. मात्र दिल्लीत रेल्वे बोर्डासोबत झालेल्या बैठकीत बोर्डाने सामान्य लोकलचे केवळ ३ डबे वातानुकूलित करण्याला तत्त्वत: मंजुरी दिल्याने या वादावर आता पडदा पडला आहे. 

मात्र १५ डब्याच्या लोकलचे ६ डबे वातानुकूलित असतील. या प्रस्तावाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. ही मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील कामे होतील, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं. 

हेही वाचा- मेट्रो-१ वर पेपर क्यूआर तिकीट सुविधा

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement