Advertisement

मेट्रो-१ वर पेपर क्यूआर तिकीट सुविधा

मुंबईत मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

मेट्रो-१ वर पेपर क्यूआर तिकीट सुविधा
SHARES

मुंबईत मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे पेपर क्यूआर तिकीट सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळं इतर तिकीट माध्यमांच्या व्यतिरिक्त प्लास्टिक टोकन तिकीटचा वापर थांबविणं शक्य होणार आहे. मेट्रो-१ च्या म्हणण्यानुसार, दररोज मेट्रोच्या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल १.८० लाख प्लास्टिक टोकन देण्यात येतं.

मेट्रो-१ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, मेट्रोचं प्लॅस्टिक टोकन तिकीट हे ३ ग्रॅमचं असतं. त्यामुळं कागदाच्या तिकीटचा वापर केल्यास ५०० किलोग्रॅम प्लास्टिकचा वापर टाळत येईल. तसंच, प्लास्टिक प्रदूषण रोखण्यातही मदत होणार आहे. ही तिकीट यंत्रणा निश्चित करण्यासाठी मेट्रो-१ च्या सर्व १२ स्थानकांवर पेपर क्यूआर तिकीट यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

मेट्रोच्या स्थानकांवर सुरूवातीच्या टप्प्यात एकूण २५ मशीन उपलब्ध करण्यात येणार आहेत. पेपर क्यूआर तिकीटांची सुविधा धीम्या गतीनं कार्यन्वित करण्यात येणार असून, प्लॅस्टीकच्या टोकनचा वापर बंद करण्यात येणार आहे. त्याशिवाय, पेपर क्यूआर तिकीटमुळं वेळेची बचत होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा