Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

अनधिकृत फेरीवाल्यांवर पश्चिम रेल्वेची कारवाई

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं फेरीवाल्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांवर पश्चिम रेल्वेची कारवाई
SHARES

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं फेरीवाल्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. आरपीएफनं २०२० मध्ये अनधिकृत फेरीवाले, विक्रेते, भिकारी यांच्याविरोधात मोहीम राबवली. या कारवाईत ३२.८४ लाख आणि एप्रिल २०२१ पर्यंतच्या १९.७० लाख असे एकूण ५२ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली.

आरपीएफनं २०२० मध्ये केलेल्या कारवाईत ८६५४ फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यामध्ये ३२८४५१९ रुपयांचा दंड वसूल केला. २०२१ मध्ये २४ एप्रिलपर्यंत फेरीवाले आणि भिकारी यांच्यावर कारवाई करून ७६९५ जणांना अटक करून त्यांच्याकडून १९,७०,०४५ रुपयांचा दंड वसूल केला.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात २०२० मध्ये ४४३८ अनधिकृत विक्रेते, भिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २१,९७,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर एप्रिल २०२१ पर्यंत ३६९८ घटना समोर आल्या. यामध्ये १५,५०,१९५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीव रेल्वे प्रशासनानं सध्यस्थितीत सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वे प्रवास बंद केला. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासास मुभा देण्यात आली आहे. मात्र, तरिही लोकल ट्रेनमधून फेरिवाले सर्रास फिरताना दिसत आहेत. 



हेही वाचा -

सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट, ७१ हजार बरे

लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा