Advertisement

पायलटनं इतक्या घाईनं लँडिंग का केलं?


पायलटनं इतक्या घाईनं लँडिंग का केलं?
SHARES

मुंबई - आरे कॉलनीतील दुर्घटनाग्रस्त झालेल्या हॅलिकॉप्टरचे पॅनिक लँडिंग करण्याचा निर्णय वैमानिकानं का घेतला असावा, असा प्रश्न हेलिकॉप्टर जॉय राइडच्या संचालकांनाच पडलाय. हेलिकॉप्टरचा छिन्नविछिन्न सांगाडा घटनास्थळी असून, भोवती बघ्यांची गर्दी कायम आहे. तेथेच भेटलेले अमन एव्हिएशनचे राजेंद्र जोहरी यांनी काही मुलभूत मुद्दे उपस्थित केलेत. स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजरनुसार क्लच यंत्रणा काम करीत नसल्यास एक इशारा देणारा दिवा पेटला असेल अशावेळी त्यांनी सर्किट ब्रेक खेचला असता तर Land as soon as praticable, असा संदेश त्यांना मिळाला असता. Land as soon as possible नव्हे म्हणजेच सुयोग्य जागा मिळेपर्यंत ते मार्गक्रमणा करू शकले असते. हॅलिकॉप्टर सुरू होते तेव्हा ते सुरू होते आणि त्याचा पंखाही फिरत होता. याचा अर्थ ऑटोरोटेशनवर म्हणजेच हवेच्या झोतावर पंखा फिरण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी आधी शेतात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना वाचविण्यासाठी जागा सोडली. मात्र डाव्याबाजूच्या शेतात ते का उतरू शकले नाहीत हे कोडं असल्याचं ते म्हणालेत. अपघातस्थळावरील झाड हे हेलिकॉप्टर आदळण्याएवढं मोठं नाही, मात्र त्याच्या फांद्या पंख्यात जाऊन पंखांना अटकाव होऊ शकतो. हेलिकॉप्टरचे इंजिन साधारण 260 अंश तापमानापर्यंत तापलेले असते, हेलिकॉप्टर उलटल्यावर त्याच्यावर इंधन पडून त्याने लगेच पेट घेतला असावा. हेलिकॉप्टरच्या प्रत्येक सुट्ट्या भागाला आर्युमर्यादा असते. या हेलिकॉप्टरच्या क्लच सिस्टमचे आयुष्य 2200 तासांचे असते. या हेलिकॉप्टरच्या क्लच सिस्टीमचा 1400 तासांहून कमीच वापर झाला होता. याच हेलिकॉप्टरनं के. मिश्रा यांनी रविवारी सकाळी मुंबईदर्शनाची एक उड्डाणफेरीही केली होती. हेलिकॉप्टरमध्ये जराही दोष असता तरी कॅ. मिश्रा यांच्यासारख्या शिस्तीच्या वैमानिकानं जराही तडजोड केली नसती, असे जोहरी म्हणालेत. तरीही कॅ. मिश्रा यांनी दाखवलेले धाडस हे पुरस्कार योग्य आहे आणि आम्ही येत्या दोन दिवसातच जॉयराइडही सुरू करत असल्याचं जोहरी यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा