Advertisement

लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे प्रशासनाचा 'मोठा' निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला लोकल प्रवास आता सुरू करण्यात आला आहे.

लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे प्रशासनाचा 'मोठा' निर्णय
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला लोकल प्रवास आता सुरू करण्यात आला आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलप्रवासास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळं आता रेल्वे स्थानकावर तसंच लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढण्याची भीती रेल्वे प्रशासनाला सतावते आहे. यामुळं आता रेल्वे प्रशासनाने गर्दी नियोजनासाठी फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या वाहतुकीस सज्ज झाली आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी एकूण २,९८६ फेऱ्या आज, सोमवारपासून सुरू होणार आहेत. यापैकी मध्य रेल्वेवर १,६८६ आणि पश्चिम रेल्वेवर १,३०० फेऱ्या धावणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह राज्यातील कठोर निर्बंध शिथिल झाले आहेत. दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पडत असताना, लसीकरणही सुरू आहे. लसधारकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत असल्याने गर्दी नियोजनासाठी रेल्वे प्रशासनाकडून पाऊल उचलण्यात आले आहे.

मध्य रेल्वेवर १,६१२ फेऱ्या धावत होत्या. आता लसधारक प्रवाशांना लोकलप्रवासाची मुभा मिळाल्याने ७४ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील ९५ टक्के लोकलफेऱ्या पूर्ववत झाल्या आहेत. करोनापूर्व काळात एकूण १,७७४ फेऱ्या धावत होत्या.

पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांमध्ये ९९ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे १,२०१ वरून फेऱ्यांची संख्या १,३०० पर्यंत पोहोचली आहे. करोनापूर्व काळातील एकूण लोकल फेऱ्यांपैकी (१,३६७ फेऱ्या) ९५ टक्के लोकलफेऱ्या सध्या प्रवाशांसाठी धावत असून, राज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रवाशांना लोकलप्रवासाची मुभा आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा