Advertisement

मुंबई-गोवा प्रवास अर्ध्या तासाने कमी, तेजस एक्स्प्रेसचा वेग वाढला

वेग वाढल्याने तेजस एक्स्प्रेस अाता छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून गोवाच्या करमाळी स्थानकापर्यंत ८ तासात पोहोचणार अाहे. हे अंतर कापण्यासाठी जन शताब्दी एक्स्प्रेसला ८ तास ३० मिनिटे लागतात.

मुंबई-गोवा प्रवास अर्ध्या तासाने कमी, तेजस एक्स्प्रेसचा वेग वाढला
SHARES

मुंबई-गोवा दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसची अनेक वेळा चाचणी करण्यात अाली. या चाचण्यांनंतर अखेरीस ही ट्रेन १२० किलोमीटर प्रति तास वेगाने धावू लागली अाहे. मागील अाठवड्यापासून तेजस एक्स्प्रेस रोहा-मडगाव या दरम्यान वाढलेल्या वेगाने धावू लागली अाहे. या ट्रेनचा वेग वाढल्याने मुंबई ते गोवामधील अंतर कापण्यासाठी अाता १५ ते ३० मिनिटे कमी लागणार अाहेत. तर या मार्गावरील ही ट्रेन अाता सर्वाधिक वेगाने धावणारी ट्रेन बनली अाहे.


अाधी ११० किमी वेग

२०१७ मध्ये भारतीय रेल्वेने मुंबई अाणि गोवा दरम्यान प्रीमियम लक्झरी सुविधा चेअर कार तेजस एक्स्प्रेसची सुरूवात केली. या ट्रेनचा अाधी वेग ११० किलोमीटर प्रति तास होता. अाता या ट्रेनचा वेग प्रति तास १२० किलोमीटर झाला अाहे. ही ट्रेन जास्तीत जास्त प्रति तास १६० किलोमीटर वेगाने धावू शकते. 


लक्झरी सुविधा

वेग वाढल्याने तेजस एक्स्प्रेस अाता छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून गोवाच्या करमाळी स्थानकापर्यंत ८ तासात पोहोचणार अाहे. हे अंतर कापण्यासाठी जन शताब्दी एक्स्प्रेसला ८ तास ३० मिनिटे लागतात. रेल्वे प्रवाशांना लक्झरी सुविधा देण्यासाठी तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात अाली अाहे. या ट्रेनमध्ये वायफाय, प्रत्येक अासनावर मोबाइल चार्जिंग अाणि यूएसबी पॉइंट्स, हेडफोनसह एलसीडी स्क्रीन, बायो-टॉयलेट, सीसीटीवी कॅमेरा अादी सुविधा अाहेत. 



हेही वाचा - 

प्रगती एक्स्प्रेसमधील सामान गेलं चोरीला

नाशिक-कल्याण लोकलची येत्या १५ दिवसांत चाचणी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा