Advertisement

लोकल प्रवासात पुन्हा एकदा महिला जखमी


लोकल प्रवासात पुन्हा एकदा महिला जखमी
SHARES

वांद्रे ते विरार असा लोकलने प्रवास करणारी महिला जखमी होण्याचा प्रकार पुन्हा एकदा बुधवारी रात्री घडला. मिरा रोडला राहणारी ही महिला रात्री १० वाजेच्या दरम्यान आपल्या मित्रासोबत ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी होती. अंधेरी-जोगेश्वरी स्थानकादरम्यान अचानक या महिल्या डोक्यावर काहीतरी येऊन आदळलं, त्यात ती जखमी झाली.  


ट्रेन थांबवून त्वरीत उपचार

त्यामुळे, जोगेश्वरी स्थानकांत लोकल थांबवून जखमी महिलेला ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आलं. तिच्या जखमेवर मलमपट्टी करुन तिला लगेच डिस्चार्ज देण्यात आला.


तक्रारीची नोंद नाही

याप्रकरणी अंधेरी जीआरपी पोलीस पुढील तपास करत आहेत. शिवाय, याप्रकरणात महिलेने कुठलीही तक्रार दिलेली नाही. तरीही आम्ही सीसीटिव्हीच्या मदतीने काही हाती लागतं का यासाठी प्रयत्न करणार आहोत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्ही या भागाचं पेट्रोलिंग करणार आहोत असं जीआरपी पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा-

त्यांनी धावत्या ट्रेनमध्येच लग्न लावलं की हो!

मध्य रेल्वेचा ५ तासांचा नाईट ट्रॅफीक ब्लॉक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा