अन् 'ती' लोकलसोबत फरफटत गेली!

कांजूर मार्ग स्थानकात एका महिलेचा जीव थोडक्यात वाचला. स्थानकावर उपस्थित कॉन्स्टेबलने आपला जीव धोक्यात घालून एका महिलेचा जीव वाचवला. पूनम चेतन काळसानी असं या महिलेचं नाव असून ती विक्रोळी इथं राहते.

  • अन् 'ती' लोकलसोबत फरफटत गेली!
SHARE

रेल्वे टपावरून प्रवास करू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका, चालत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरू नका अशा सूचना रेल्वे प्रवाशांना वारंवार दिल्या जातात. तरीही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून चालत्या ट्रेनमधून चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच एका प्रकारात मध्य रेल्वेच्या कांजूर मार्ग स्थानकात एका महिलेचा जीव थोडक्यात वाचला. स्थानकावर उपस्थित कॉन्स्टेबलने आपला जीव धोक्यात घालून एका महिलेचा जीव वाचवला. पूनम चेतन काळसानी असं या महिलेचं नाव असून ती विक्रोळी इथं राहते.


बघा, अशी घडली दुर्घटनानेमकी घटना काय?

कांजूरमार्ग स्थानकात लोकल आल्यानंतर पूनम यांनी चालत्या लोकलमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र खाली उतरत असताना त्यांच्या साडीचा पदर लोकल ट्रेनच्या दरवाज्याच्या हॅंडलला अडकला. तेवढ्यात लोकलने वेग घेतला अन् पूनम या हिसक्याने दुसऱ्याच क्षणी प्लॅटफाॅर्मवर पडल्या. पदर हँडलला अडकलेलाच असल्याने महिला चक्क लोकलबरोबर फरफटत पुढं जाऊ लागली.'असा' वाचला जीव

हा प्रकार प्लॅटफाॅर्मवर उपस्थित आरपीएफ काॅन्स्टेबलने पाहिल्यावर त्यांनी त्वरीत पूनम यांना खेचण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात काॅन्स्टेबलचा तोल जाऊन ते देखील प्लॅटफाॅर्मवर पडले. सुदैवाने इतर प्रवाशांनी पूनम यांना लोकलपासून दूर अोढल्याने त्यांचा जीव वाचला.हेही वाचा-

वाशीच्या रघुलीला मॉलध्ये सिलिंगचा भाग कोसळला

खड्ड्यात जावो जनता, आम्हाला नाही चिंतासंबंधित विषय
ताज्या बातम्या