Advertisement

खारकोपर ते उरण मार्गाचं काम संथगतीनं सुरू

या मार्गातील १४ किलोमीटरपैकी ३ किलोमीटरच्या भूसंपादनाला अद्यापही गती मिळालेली नाही.

खारकोपर ते उरण मार्गाचं काम संथगतीनं सुरू
SHARES

हार्बर रेल्वे मार्गावरील बेलापूर-सीवूड-उरण उपनगरीय रेल्वे मार्गातील खारकोपर ते उरण मार्गाचे काम संथगतीनं सुरू आहे. या मार्गातील १४ किलोमीटरपैकी ३ किलोमीटरच्या भूसंपादनाला अद्यापही गती मिळालेली नाही. त्यामुळे प्रकल्पपूर्तीचे उद्दिष्ट मार्च २०२१ ऐवजी आणखी एक वर्ष पुढे गेले आहे. उरणला नवी मुंबईशी जोडणाऱ्या बेलापूर-सीवूड-उरण उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम १९९७ पासून सुरू असून ते अपूर्णच आहे.

या मार्गातील पहिला टप्पा असलेल्या बेलापूर, नेरुळ ते खारकोपर रेल्वे मार्ग १२ नोव्हेंबर २०१८ ला सुरू झाला. बेलापूर ते खारकोपर ते बेलापूर दोन्ही मार्गावर २० फेऱ्या, तर नेरुळ ते खारकोपर ते नेरुळ मार्गावर २० फेऱ्या होतात. त्यानंतर यातील दुसरा टप्पा असलेल्या खारकोपर ते उरण मार्गाचं काम हाती घेण्यात आले. परंतु, काही कारणात्सव प्रकल्पाला गती मिळाली नाही. खारकोपर ते उरणच्या १४ किलोमीटरच्या टप्प्यापैकी ११ किलोमीटरची जमीन मध्य रेल्वेच्या ताब्यात आली आहे.

या मार्गावर ५ स्थानकं, २ मोठे पूल, ४१ छोटे पूल, ४ उड्डाणपूल इत्यादी असून ही महत्त्वाची कामं टाळेबंदीत उपलब्ध मनुष्यबळातही पूर्ण करण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात आला आहे. परंतु उर्वरित ३ किलोमीटरचं भूसंपादन अद्यापही झालेलं नाही. ही वनजमीन असून सिडको आणि वनविभागात यावरून चर्चा सुरूच आहे.



हेही वाचा -

'या' १० वॉर्डमध्ये ४६ टक्के कोरोना रुग्ण, पालिका देणार विशेष लक्ष

COVID 19 लसीच्या केईएम रुग्णालय घेणार चाचण्या



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा