Advertisement

जगातील सर्वात मोठे विमान मुंबई एअरपोर्टवर उतरले

या विमानाला पाहून विमानतळावर उपस्थित प्रवासीही अवाक् झाले.

जगातील सर्वात मोठे विमान मुंबई एअरपोर्टवर उतरले
SHARES

नागरी उपयोगासाठीचे जगातील सर्वात मोठे विमान मंगळवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. ‘एअरबस बेलुगा’ असं या विमानाचे नाव आहे. या विमानाला पाहून विमानतळावर उपस्थित प्रवासीही अवाक् झाले.

एअरबस कंपनीचे ‘ए३००-६०० एसटी’ हे ‘बेलुगा’ नावे ओळखले जाणारे विमान ५१ टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे.

वैमानिक खाली व विमानाचा मुख्य भाग त्याच्या डोक्यावर, तसेच खालील भागापेक्षा दुप्पटीने मोठी असलेली पाठ, अशा अत्यंत वेगळ्या आकारातील हे विमान आहे. ते मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यावेळी सारेच उपस्थित प्रवासी अवाक् झाले.

उपस्थित प्रवाशांना हे बहुचर्चित विमान पहिल्यांदाच बघता आले. याखेरीज प्रवासी वाहतुकीत जगात सर्वाधिक अत्याधुनिक असलेले ‘एम्ब्रेअर ई१९५-ई२’ (प्राफिट हंटर) हे विमानदेखील मंगळवारी मुंबईत आले. आकर्षक रंगसंगती आणि आगळ्या आलिशानतेसाठी हे विमान ओळखले जाते.



हेही वाचा

ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर पुढील वर्षी आणखी एक स्थानक होणार

Mumbai Local News: वांद्रे स्टेशन ते टर्मिनस लवकरच स्कायवॉकद्वारे जोडले जाईल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा