Advertisement

फुकट्या प्रवाशांकडून 6 कोटींचा दंड वसूल


फुकट्या प्रवाशांकडून 6 कोटींचा दंड वसूल
SHARES

मुंबई - पश्चिम रेल्वेने 2016 च्या जानेवारी ते डिसेंबर महिन्यादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरील कारवाईसह अन्य प्रकरणांत सहा कोटी 70 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यात एकूण एक लाख 76 हजार प्रकरणांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेने गतवर्षी डिसेंबरमध्ये केलेल्या कारवाईत मेल/एक्स्प्रेसची तिकिटे बेकायदेशीररीत्या हस्तांतरित करण्याची 148 प्रकरणं उघडकीस आणली. त्यासह 1 हजार 23 गर्दुल्ले आणि अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करत 106 जणांची तुरुंगात रवानगा केली. पश्चिम रेल्वेच्या कमर्शिअल विभागाने 160 दलालांवर कारवाई केली आहे.

रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला स्क्वॉडने महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या 12 वर्षांवरील 156 शालेय विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तर फुकट्या प्रवाशांच्या कारवाईत पश्चिम रेल्वेने आतापर्यंत सहा कोटींचा दंड वसूल केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा