Advertisement

हास्यास्पद मराठीवर पश्चिम रेल्वेचा माफीनामा, निर्दोष भाषेचं आश्वासन


हास्यास्पद मराठीवर पश्चिम रेल्वेचा माफीनामा, निर्दोष भाषेचं आश्वासन
SHARES

एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वेच्या प्रवाशांसाठी वेगवेगळे मार्गदर्शन करणारे स्टिकर्स पादचारी पुलांच्या पायऱ्यांवर लावण्यात आले. पण, त्या स्टिकरवर करण्यात आलेले मराठी भाषांतर हास्यास्पद होते. भाषांतर करण्याच्या नादात पश्चिम रेल्वेने मराठी भाषेचे धिंडवडे काढले होते. त्यावरून प्रवाशांकडून टीका करण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेला जाग आली आहे. त्यावर पश्चिम रेल्वेने माफीही मागितली आहे. शिवाय, यापुढे निर्दोष मराठीचा वापर केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.


परस्पर निर्णय घेतल्यामुळे हा प्रकार

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील इंजिनिअरिंग विभागाने कमर्शिअल विभागाला महत्त्व न देता परस्पर निर्णय घेतल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. पादचारी पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेच्या सूचना देण्यासाठी पुलाकडील पायऱ्यांच्या दर्शनी भागांत मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सूचनांचे स्टिकर लावण्यात आले. पण, त्या वाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हास्यापद चुका होत्या. भाषांतरावरून वेगवेगळ्या स्तरावरुन टीका झाल्यानंतर रेल्वेच्या विभागीय आयुक्तांनी ट्विट करत अशा चुकीच्या भाषांतराबद्दल प्रवाशांची माफी मागत यापुढे शुद्ध मराठी वापरण्याचे आश्वासन दिले आहे.


पुन्हा नव्याने लावणार स्टिकर

पश्चिम मार्गावरील आतापर्यंत १६ स्थानकांच्या पादचारी पुलांवर हे स्टिकर लावण्यात आले आहेत. ते सर्व स्टिकर्स काढून नव्याने शुद्ध मराठीतील स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. या कामासाठी १ लाखापेक्षा कमी खर्च आल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.



हेही वाचा

शॉर्टकटला म्हणतात चेंडू! आता काय म्हणावं रेल्वेच्या मराठीला?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा