Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

बेस्ट बसवर तरुणांनी केली दगडफेक; वाचा नेमकं काय झालं?


बेस्ट बसवर तरुणांनी केली दगडफेक; वाचा नेमकं काय झालं?
SHARES

बसथांब्याच्या काही अंतर पुढे नेऊन बस उभी केल्याच्या रागातून ३ ते ४ तरुणांनी बसवर दगडफेक केल्याची घटना बुधवारी गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात घडली. या तरुणांनी बसचा चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर बसडेपोमधून चालक दीपक जाधव आणि वाहक सुचित्रनंद चव्हाण बुधवारी संध्याकाळी क्रमांक ४९८ ही बस घेऊन बाहेर पडले. ९० फूट रस्त्यावरील नवीन बसडेपोसमोर असलेल्या थांब्याजवळ बस आली असता या ठिकाणी काही वाहने लावण्यात आली होती. त्यामुळे चालक जाधव यांनी ही बस थोडी पुढे नेऊन उभी केली.

थांब्यावर बस का थांबवली नाही, अशी विचारणा करीत बसमध्ये चढलेल्या तरुणांनी वाहक चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चव्हाण यांनी शिवीगाळ करू नका, असे बजावताच ३ ते ४ तरुणांनी बसमध्येच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बसच्या काचेवरही ते आदळआपट करू लागले.

चालक जाधव यांनी १०० नंबरवर संपर्क साधून पोलिसांना कळविले. पोलिसांना माहिती दिल्याचे कळताच या तरुणांचा पारा आणखी चढला आणि त्यांनी बसवर दगडफेक केली. लाकडी बांबूने मारहाण करीत चव्हाण यांना जखमी केले.

शिवाजीनगर पोलिस बसचालक आणि वाहकाच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. पोलिस घटना जाणून घेत असतानाच पळ काढणाऱ्या तरुणांनी त्यांच्यावरही दगड भिरकावले. एका पोलिसांच्या छातीवर दगड लागला.

पोलिस पकडण्याआधीच तिघेही तरुण तेथून पसार झाले. सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी या तरुणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा