Advertisement

खुशखबर! सफाई कर्मचा-यांसाठी १६ हजार घरे देणार - धनंजय मुंडे

मात्र मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य़ व्हावा, यासाठी दररोज या नाल्यांमध्ये मानेपर्यंत उतरून त्यातली हजारो मेट्रिक टन गाळ हातांनी उपसणाऱ्या कामगारांच्या आरोग्यासह इतर प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.

खुशखबर! सफाई कर्मचा-यांसाठी १६ हजार घरे देणार - धनंजय मुंडे
SHARES

मुंबईसह महाराष्ट्राला स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचारांसाठी (Cleaners) आता १६ हजार घरे उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा  सामाजिक न्याय मंत्री (Social justice minister) धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांनी केली. सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुंडे बोलत होते.या घोषणेनंतर सफाई कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन

पावसाळा आला की मुंबईच्या नालेसफाईवरून राजकारण रंगलेले असते. मात्र मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य़ व्हावा, यासाठी दररोज या नाल्यांमध्ये मानेपर्यंत उतरून त्यातली हजारो मेट्रिक टन गाळ हातांनी उपसणाऱ्या कामगारांच्या आरोग्या(helth)सह इतर प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. सध्या या सफाई कामगारांना प्रश्न भेडसावतोय तो त्यांच्या राहण्याचा,  सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक मंत्री धनंजय मुंडे समोर कामगारांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. यावर योग्य तो तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल असे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याबाबतच्या विषयी मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल,” असं मुंडे यांनी बैठकीत सांगितलं.


हेही वाचाः- मेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा

या बैठकीत सर्वात महत्त्वाची घोषणा करण्यात आली ती मुंबईकरांसाठी त्याच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस राबून मुंबई स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांना पक्की घरे देणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आयुक्त प्रवीण परदेशी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा