वांद्रे किल्ल्याची दुरवस्था, पालिका करणार सुशोभीकरण

पोर्तुगिजांनी (Portuguese) बांधलेल्या एेतिहासिक वांद्रे किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वांद्रे किल्ला (Bandra Fort) परिसराचे सुशोभीकरण (Beautification) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) घेतला आहे.

SHARE

पोर्तुगिजांनी (Portuguese) बांधलेल्या एेतिहासिक वांद्रे किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वांद्रे किल्ला (Bandra Fort) परिसराचे सुशोभीकरण (Beautification) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) घेतला आहे. सुशोभीकरणाच्या कामात पडझड झालेल्या भिंतींची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या सुशोभीकरणात वनीकरणाचाही समावेश करण्यात आला आहे.

 वांद्रे किल्ल्याच्या (Bandra Fort) सुशोभीकरणासाठी १९ कोटी ११ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. येत्या दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर वांद्रे किल्ला कात टाकून नव्या रूपात मुंबईकरांसमोर येणार आहे. माहीमची खाडी सुरक्षित बनविण्यासाठी पोर्तुगिजांनी सात बेटांच्या मुंबईत किनाऱ्यालगत उत्तरेला वांद्रे किल्ला, तर दक्षिणेला वरळी किल्ला (Worli Fort) उभा केला. या दोन किल्ल्यांमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने माहीम खाडीवर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले. स्वातंत्र्यानंतर मुंबई (mumbai) मधील किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सर्वच किल्ल्यांची मोठी दुरवस्था झाली. किल्ल्यांची काही भागातील तटबंदी ढासळली, निर्जन किल्ले प्रेमीयुगुलांचे अड्डे बनले. वांद्रे किल्ल्याचीही अशीच दुरवस्था झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) वांद्रे किल्ल्याच्या परिसराचे सुशोभीकरण (Beautification) करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशोभीकरण (Beautification) योजनेत मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतीचे निष्कासन, सुरक्षा भिंतीची पुनर्बाधणी, शोभिवंत जाळी बसविणे, प्रवेशद्वार सुशोभित करणे, शौचालय बांधणे, गांडूळ खतनिर्मितीसाठी खड्डा खोदणे, अंतर्गत बेसाल्ट दगडाचे पदपथ बांधणे, पुरातन वास्तूच्या अनुषंगाने दिशा-चिन्हे आणि नाव-पट्टी बसविणे, जल ठिकाणे बांधणे, खराब झालेली बैठक व्यवस्था दुरुस्त करणे, मैदानात विद्युत दिवे बसविणे, हिरवळीची कामे आणि शहर वनीकरण आदींचा समावेश आहे. या कामांसाठी २० कोटी ६२ लाख ६५ हजार रुपये खर्च पालिकेला अपेक्षित होता. या कामासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत १५ टक्के कमी दराने निविदा सादर करणाऱ्या कंत्राटदाराला १९ कोटी ११ लाख ४ हजार रुपयांचे कंत्राट देण्याची तयारी मुंबई महापालिका (mumbai municipal corporation) प्रशासनाने सुरू केली आहे.

पोर्तुगीजांनी (Portuguese)१६४० मध्ये वांद्रे किल्ला (Bandra Fort)  बांधला. वांद्रे किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसरही रमणीय आहे. या किल्ल्यावर अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. सी लिंक (C Link) आणि अरबी समुद्रामुळे या किल्ल्याचे सौंदर्य आजही मुंबईकरांना आकर्षित करते. सध्या इथे प्री वेडिंग शूट होते. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला आजही तग धरून असला तरी त्याच्या आजूबाजूच्या परिसराची मात्र रया गेली आहे. त्यामुळे किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण पालिका करणार आहे. आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण केले तर इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा -

मुंबई महानगर पालिकेत ८७४ जागांसाठी भरती
लाच घेतल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक

महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 'इतका' भाग बेस्टसाठी खर्च
संबंधित विषय
ताज्या बातम्या