Sawali NGO's health check-up camp

 Mayuresh Park
Sawali NGO's health check-up camp
Sawali NGO's health check-up camp
See all
Mayuresh Park, Mumbai  -  

सोनापूर - ‘सावली’ या सामाजिक संस्थेकडून भांडुप पश्चिमेकडील सोनापूर परिसरात आरोग्य आणि हृदय चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये टू.डी ईको, बायपास ऑपरेशन, ई. सी .जी., ब्लड प्रेशर, कॅन्सर ऑपरेशन, अँन्जीओग्राफी या तपासणी मोफत करण्यात आल्या. दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या हृदयाची कळजी कशी घ्यायला हवी, या संकल्पनेवर शिबिराचे आयोजन केले होते. भांडुपकरांनी या चिकित्सा शिबिराला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल म्हणून सावली संस्थेचे संस्थापक आणि शिबिराचे उद्घाटक गणेश श्रीधर जाधव यांनी आभार मानले. यावेळी अनवर मुल्ला, नरसिंग तिवारी, ईरशाद खान आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments