Advertisement

World Photography Day 2020: इन्स्टाग्रामवर हिट असलेल्या मुंबईतल्या या ५ ठिकाणांना भेट द्या

फोटोच्या माध्यमातून मुंबईतल्या या ५ जागांना भेट द्या...

World Photography Day 2020: इन्स्टाग्रामवर हिट असलेल्या मुंबईतल्या या ५ ठिकाणांना भेट द्या
SHARES

जागतिक छायाचित्रण दिन १९ ऑगस्टला साजरा केला जातो. १७७ वर्षा आधी १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रांसने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात.

१८३७ साली फ्रेंच तंत्रज्ञ Louis Daguerre आणि Joseph Nicephore Niepce यांनी Daguerreotype फोटोग्राफी प्रोसेस चा शोध लावला आणि त्याचे पेटंट घेतले. ही प्रोसेस म्हणजे फोटो आयन ने तांब्याच्या प्लेटवर ज्याला चांदीचा मुलामा दिला आहे छायाचित्र ठसवलं गेलं. हे पहिलं प्रिंटेड छायाचित्र मानलं जातं जे दीर्घकाळर्यंत टिकतं. फ्रेंच सरकारला ते पेटंट उपयोगी वाटले म्हणून त्यांनी ते विकत घेतलं.

काही दिवसातच १९ ऑगस्ट १९३९ साली ते सामान्य जनतेसाठी खुलं केलं गेलं. पेटंट खुलं केलं गेल्यापासून फोटोग्राफी क्षेत्राची झपाट्याने प्रगती झाली. तेव्हा पासून हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो.

खाली दिलेले फोटो पाहून तुम्ही त्या ठिकाणांना भेट देऊ शकता. 

गेट वे ऑफ इंडियाः भारताचे प्रवेशद्वार २० व्या शतकात बांधलं गेलेलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. १९११ मध्ये ऍपोलो बंदर इथं किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या उद्रेकासाठी स्मारक उभारण्यात आलं.

इंडो-सरैसेनिक शैलीमध्ये बांधलेला, गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम १९२४ साली पूर्ण झाले. या ठिकाणी गरमागरम चहाचा आनंद घेत आपल्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत गप्पा मारण्याचा आनंद घेता येऊ शकतो.  

  • छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी): सीएसएमटीला आधी व्हिक्टोरीया टर्मिनस नावानं ओळखलं जायचं. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेलं हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आलं. महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरलं आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, सीएसटी ताजमहालनंतर भारतातील सर्वाधिक छायाचित्रण केलेलं स्थान आहे!

  • मरीन ड्राइव्ह : मरीन ड्राईव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे. हा रस्ता मुंबई इथल्या नरीमन पॉईंट वरून सुरू होऊन गिरगाव चौपाटी इथं संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय आहे. इथं तुम्हाला अनेक जण फेरफटका मारताना, जॉगिंग करताना, गप्पा टप्पा करताना, समुद्रकाठी बसून चहाचा आनंद घेताना दिसतील.
  • मुंबईत येणारा प्रत्येक व्यक्ती मरिन ड्राइव्हचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. मुंबईत राहणाऱ्यांनी कधी ना कधी मरिन ड्राइव्हला भेट देऊन एखादा फोटो देखील टिपला असेल

 

  • कुलाबा कॉजवे : कुलाबा हे मुंबईच्या सात बेटांपैकी एक बेत असून ज्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलेलं आहे. कुलाबा कॉजवे शॉपिंग करणाऱ्यांसाठी नंदनवन आहे. रस्त्यांच्या दुतर्फा तुम्हाला इथं  बाजारपेठा सजलेल्चेया दिसतील.

 


  • वांद्रे-वरळी सी लिंक : मुंबई किनारपट्टीवरील कमान ओलांडून पसरलेला हा मुंबईतील आठ-लेन केबल-स्टिड पूल आहे. आधुनिक वास्तूचे प्रतिनिधित्व करणारे आर्किटेक्चरल आश्चर्य म्हणून वांद्रे वरळी सी लिंक ओळखले जाते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा