अंधेरीत मैदानाची दुरवस्था

 Andheri west
अंधेरीत मैदानाची दुरवस्था
अंधेरीत मैदानाची दुरवस्था
अंधेरीत मैदानाची दुरवस्था
अंधेरीत मैदानाची दुरवस्था
See all
Andheri west, Mumbai  -  

अंधेरीच्या आदर्शनगर क्र २  अष्टभुजा अंबिका मार्गाजवळ असलेल्या  मैदानाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. १५ वर्षापासून रहिवाशांना पावसाळ्यात मच्छर, दुर्गंधीमुळे रोगराईचा सामना करावा लागतो.  या परिसरात असलेल्या मैदानात  गेल्या अनेक वर्षा पासून गणेश उत्सव ,नवरात्री उत्सव आणि इतर उत्सव साजरा केला जात होता . मात्र मैदानाची दुरवस्था झाल्याने इथे कोणताही उत्सव साजरा करताना अडथळा निर्माण होत आहे. या भागात कचरा आणि घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक आमदार नगरसेवक यांना तक्रार करूनही लक्ष देत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे

 

Loading Comments