विसर्जनादिवशी व्यसनमुक्तीचा संदेश

Mumbai
विसर्जनादिवशी व्यसनमुक्तीचा संदेश
विसर्जनादिवशी व्यसनमुक्तीचा संदेश
विसर्जनादिवशी व्यसनमुक्तीचा संदेश
विसर्जनादिवशी व्यसनमुक्तीचा संदेश
See all
मुंबई  -  

लालबाग - अनंत चतुर्दशीचे औचित्य साधून नशाबंदी मंडळाने 'व्यसन घालवा- उत्सव वाचवा' या मोहिमेअंतर्गत व्यसनमुक्तीचा संदेश दिलाय.

यावेळी गणरायाला साकडे घालून व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 'गणपती बाप्पा सर्वांकडून वचन घे फक्त आजचा दिवस नाही हा मूलमंत्र दे' असा संदेश मंडळाचे स्वयंसेवक देत होते. लालबाग, परळ, काळाचौकी या भागात मंडळाच्या स्वयंसेवकांनी भाविकांना व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पत्रके वाटली. यावेळी व्यसनमुक्तीच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. व्यसनाच्या विरोधात प्रचार, प्रसार व संविधानातील कलम 47 च्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणाऱ्या घोषणाही देण्यात येत होत्या. यावेळी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलासदेखील उपस्थित होत्या.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.