गणेशोत्सवात बाहुबलीमधील शिवजलाभिषेकाचा देखावा

 Masjid Bandar
गणेशोत्सवात बाहुबलीमधील शिवजलाभिषेकाचा देखावा

मस्जिद बंदर : गतवर्षी प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावरून अद्याप कमी झालेली नाही. अंजनैया पेनगोंडा यांनी घरातच बाहुबली चित्रपटातील देखावा साकारला आहे. मस्जिद बंदर येथील नरशी नाथा स्ट्रीटवरील महावीर दर्शन इमारतीत राहणा-या पेनगोंडा यांनी बाहुबली चित्रपटातील शिवजलाभिषेकाची प्रतिकृती घरगुती गणपतीसमोर साकारली आहे. या देखाव्याची संकल्पना अंजनैया यांची असून हा देखावा उभारण्यात त्यांच्या कुटुंबीयांनी सहकार्य केले आहे. 

Loading Comments