अखेर पलटण रोडवरच्या झाकणाची दुरुस्ती

 Pali Hill
अखेर पलटण रोडवरच्या झाकणाची दुरुस्ती

फोर्ट - क्रॉफर्ड मार्केट येथील पलटन रोडवरील तुटलेल्या झाकणाची पालिका प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई लाईव्हने सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. रस्त्याच्या मधोमध असलेले हे झाकण तुटल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे या झाकणाची दुरुस्ती होणे गरजेचे होते. अखेर मुंबई लाईव्हने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केल्याने प्रशासनाला जाग आली आणि या रस्त्याची दुरुस्ती झाली.

Loading Comments