पोलिसाने घडवले प्रामाणिकपणाचे दर्शन

 Borivali
पोलिसाने घडवले प्रामाणिकपणाचे दर्शन
Borivali, Mumbai  -  

बोरिवली - पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकतेवर नेहमीच शंका घेतली जाते. पण याला काही पोलीस अपवाद असतात. बोरिवलीतल्या एका रेल्वे पोलिसाने आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. रेल्वे पोलिसात कार्यरत असणारे महेंद्र रोहित यांना बोरिवली रेल्वे स्थानकावर महिलेचे बॅग सापडली. बॅग सापडल्याचं महेंद्र यांनी आपले वरिष्ठ अधिकारी के.के. मीणा यांना सांगितलं. बॅगेची तपासणी केली असता त्यात महिलेचा फोन सापडला. तसेच बॅगेमध्ये 3 हजार रुपये, पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड सापडले. महिलेशी संपर्क साधून बॅगेसह सर्व सामान तिला सुपुर्द करण्यात आले. 

Loading Comments