आझाद मैदानाचा मानाचा गणपती

 Churchgate
आझाद मैदानाचा मानाचा गणपती

चर्चगेट - आझाद मैदान येथील हंसामेंट कंपाउंडमध्ये मानाचा गणपती बसविला जातो. सन 1988 पासून श्री साईकृपा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने या ठिकाणी गणेशोत्सवाला सुरुवात केली. यंदा 6 फुट उंचीची पेशवाई रुपात साकरलेली गणेशमूर्ती बसविण्यात आलीय. पोलीस कर्मचारी, अधिकारी,  रेशनिंग विभागातील कर्मचारी, किल्लाकोर्ट कंपाउंडमधील वकिल असे सर्वजण आवर्जुन गणेशाचे दर्शन घेत असतात. तसेच मुंबई कॉंग्रेस कार्यालयालगतच गणपतीचा मंडप असल्यामुळे येथे येणारे लोकप्रतिनिधीही आझाद मैदानच्या राजाचे दर्शन घेवून जातात. 

Loading Comments