आरे कॉलनीतील रस्ता 'खड्ड्यात'

 Goregaon
आरे कॉलनीतील रस्ता 'खड्ड्यात'
आरे कॉलनीतील रस्ता 'खड्ड्यात'
आरे कॉलनीतील रस्ता 'खड्ड्यात'
See all

गोरेगाव - ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे आरे कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गोरेगाव पूर्व परिसरात वेस्टन हायवे पासून आत गेल्यावर आरे कॉलनीतून घाटकोपर, कु्र्ला, मरोळ या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहे. आरे प्रशासनाने आपल्या हद्दीतील रस्ता व्यवस्थित बांधला आहे. मात्र पिकनिक पाॅईंटपासून मरोळच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कुर्ला, घाटकोपरला जाण्यासाठी या मार्गाचा शॉर्ट कट म्हणून अनेक वाहन चालकांकडून वापर केला जातो. पण खड्ड्यांंमुळे येथून वाहन चालवणे त्रासदायक ठरत आहे. मात्र याची तक्रार पालिका आणि आरे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा कुणी लक्ष देत नसल्याचे तक्रार नागरिक करत आहेत.

Loading Comments