'चिल्ला मत’ अभियान

  Churchgate
  'चिल्ला मत’ अभियान
  मुंबई  -  

  आवाज फाऊंडेशनकडून चिल्ला मत असं एक आगळेवेगळे अबियान राबवण्यात येणार आहे. हायकोर्टानं दिलेल्या आदेशाप्रमाणे डीजे आणि लाउडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा बंधनकारक आहे. त्यामुळे हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा सूमेरा अब्दुल अली यांनी दिलीय. गणेशोत्सवाच्या काळात डीजे अथवा लाउडस्पीकरचा आवाज जोरजोरात ठेवू नका, असं आवाहनही त्यांनी केलंय. तसंच शहरातील शाळांमध्ये जाऊन याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. डीजे आणि लाउडस्पीकरच्या कर्कश आवाजाचा त्रास लहान मुले, वयोवृध्द नागरिक आणि गर्भवती महिलांना होत असतो. या आवाजामुळे कानाचे अनेक त्रास उद्भवतात. हद्यविकाराचा आजार असलेल्या पेशंटला याचा अधिक त्रास होतो. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या परिसरात कोणी आजारी आहे का याची चौकशी करावी, आणि नंतरच डीजे किंवा लाउडस्पीकरचा आवाज ठेवावा असं आवाहनही सूमेरा अली यांनी केलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.