आधार कार्डवरून लागला 'त्या'चा शोध

 Mumbai
आधार कार्डवरून लागला 'त्या'चा शोध
Mumbai  -  

विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडलगत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ पोलिसांना यश आलंय. मृतदेहाशेजारी मिळालेल्या आधारकार्डवरून पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवलीय रघुनाथ ठाकूर (३१) असं या तरुणाचं नाव असून, डोक्यावर प्रहार करून त्याचा खून करण्यात आल्याचं उघड झालंय. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.

  रघुनाथचा मृतदेह विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडलगतच्या झुडूपात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या मृतदेहाशेजारी पोलिसांना आधारकार्ड मिळालं होतं. त्या आधारकार्डवरून कांजुरमार्ग पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली.  

१३ ऑगस्ट रोजी कामावर गेलेला रघुनाथ फिरून येतो, असं सांगून कामावरून निघाला होता. पण तो घरी परतलाच नाही. सर्वत्र शोधशोध करूनही रघुनाथ न सापडल्यानं कुटुंबीयांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. 

Loading Comments