पादचारी पुलाअभावी प्रवाशांचे हाल

 Sewri
पादचारी पुलाअभावी प्रवाशांचे हाल
पादचारी पुलाअभावी प्रवाशांचे हाल
See all
Sewri , Mumbai  -  

शिवडी : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आचार्य दोंदेमार्ग ते शिवडी (पू.) रेल्वेस्थानक  जोडण्यात आलेला पादचारी पूल जीर्ण झाल्याने दुरुस्तीसाठी गेल्या दोन महिन्यापासून पालिकेच्या एफ-दक्षिण विभागाकडून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना जीव मुठीत धरून या जीर्ण पुलाच्या खालून रस्ता ओलांडावा लागत आहे. परंतू या समस्येकडे येथील लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तसेच काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर या मार्गावर गतिरोधक बसवण्यात यावेत. अशी मागणी शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पालिका एफ - दक्षिण विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली. असल्याचे मंडळाचे अध्यक्ष विजय इंदुलकर आणि सरचिटणीस सचिन राणे यांनी सांगितले.     

Loading Comments