स्वस्त भाजीपाला शेतक-यांना परवडेना

    मुंबई  -  

    चर्चगेट - शेतातील ताजी भाजी विकत घ्यायची आहे तर थेट मंत्रालय गाठा. कारण शेतकरी स्वत: घेऊन आलेत आपल्या शेतातील ताजी ताजी भाजी विधानभवन परिसरात. मंत्रालयाला असते दर रविवारी सुट्टी, पण तिथेच दर रविवारी भरतोय आठवडी बाजार. शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही फायदा व्हावा यासाठी सरकारने विधानभवन परिसरात हा घाट घातलाय..आता शेतातील माल थेट ग्राहकांच्या दारात येतोय, आणि दलालांची मक्तेदारी मोडीत निघालीय. पण या आठवडी बाजारात शेतक-यांच्या स्टॉलवर भाजांचे दर वेगवेगळे असल्याचं दिसून येतंय. आता या बाजारात दक्षिण मुंबईतील नागरिकांपासून थेट बोरिवलीपर्यंतचे ग्राहक ताज्या भाजीसाठी झुंबड करतायत. पण भाजांच्या दरातील फरकामुळं ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. 

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.