अखेर माझंगाव इमारतीची आग विझली

  Mazagaon
  अखेर माझंगाव इमारतीची आग विझली
  मुंबई  -  

  माझंगावमधल्या बंदुकवाला इमारतीला लागलेली आग विझवण्यात अग्शिशमन दलाला अखेर यश आलंय. चार मजली इमारतीच्या दुस-या मजल्यावर 5 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागली होती. इमारत लाकडी असल्यानं आग वाढत गेली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते.  पण अग्निशमन दलानं अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या इमारतीतल्या 44 कुटुंबाचे नजीकच्या पालिकेच्या शाळेत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. लवकरच या कुटुंबाच्या पुनर्वसनासंबंधी पालिकेकडून निर्णय घेण्यात येणार आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.